धुळ्यातील आमच्या रुग्णांच्या खऱ्या कहाण्या
प्रजनन व मातृत्व काळजी जितकी वैद्यकशास्त्राची बाब आहे तितकीच विश्वासाचीही. खाली आमच्या रुग्णांनी गुगलवर पोस्ट केलेली खरी पुनरावलोकने आहेत, जशी लिहिली तशीच — तसेच प्रत्येक रुग्ण आमच्या काळजीकडून काय अपेक्षा करू शकतो हेही.
वैयक्तिक लक्ष
प्रत्येक जोडप्याचे निदान व उपचार योजना स्वतंत्रपणे तपासली जाते. रुग्ण डॉक्टरांसोबत पुरेसा, लक्ष केंद्रित वेळ अपेक्षू शकतात — घाईचा, सर्वांसाठी सारखा सल्ला नव्हे.
प्रामाणिक व स्पष्ट मार्गदर्शन
रुग्ण त्यांचे निदान, यशाची वास्तववादी शक्यता, अपेक्षित कालावधी आणि सुचवलेल्या प्रत्येक उपचार पर्यायामागील कारण यांचे पारदर्शक स्पष्टीकरण अपेक्षू शकतात.
सलग काळजी
तीच वैद्यकीय टीम रुग्णांना पहिल्या तपासणीपासून प्रजनन उपचार, गर्भधारणा निरीक्षण व प्रसूतीपर्यंत साथ देते, त्यामुळे काळजी कधीही अनोळखी व्यक्तींकडे सोपवली जात नाही.
रुग्णांच्या यशोगाथा
ही रुग्णांनी थेट आमच्या गुगल बिझनेस प्रोफाइलवर पोस्ट केलेली खरी पुनरावलोकने आहेत — इथे जशी लिहिली तशीच दाखवली आहेत, त्यांच्या शब्दांत कोणताही बदल न करता.
“लग्नाच्या ४ वर्षांनंतर डॉ. संदीप शिलाहार यांनी दुर्बिणीची तपासणी व IUI केले — पत्नीला दिवस राहिले व आज आम्हाला मातृत्वाचा आनंद मिळाला.” मी श्री कवीश्वर भदाणे वय 29 माझी पत्नी सौ जयश्री कवीश्वर भदाणे वय 25 आम्ही धुळ्यात राहतो आमच्या लग्नाला 4 वर्षे झाली आहेत मूल होत नव्हते बऱ्याच डॉक्टरांकडे आम्ही ट्रीटमेंट केली त्यानंतर डॉक्टर संदीप शिलाहार विमल मॅटरनिटी होम व गजानन टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली सरांनी माझ्या पत्नीची दुर्बिणीची तपासणी केली त्यानंतर आय यु आय केले व माझ्या पत्नीला दिवस राहिले आता 6 महिने झाले प्रेग्नेंसी आहे सरांनी योग्य ते निदान केले व्यवस्थित ट्रीटमेंट दिले त्यामुळे आज आम्हाला माझ्या पत्नीला मातृत्वाचा आनंद मिळाला आहे मी सरांना मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो
“सरांनी ६ वर्षांपूर्वी IUI द्वारे आम्हाला पहिला मुलगा दिला, आणि आता पुन्हा ३ वर्षांनंतर IUI ने १४ आठवड्यांची गर्भधारणा झाली आहे.” मी श्री केतन अशोक पाटील वय 37 माझी पत्नी सौ कल्पना केतन पाटील वय 36 आम्ही धुळ्याला राहतो आमच्या लग्नाला 9 वर्ष झाली आहेत 6 वर्षांपूर्वी डॉक्टर संदीप शिलाहार यांच्याकडे आम्ही मूल होण्यासाठी ट्रीटमेंट केली. आय यु आय केले व आम्हाला मुलगा झाला तो 5 वर्षाचा आहे त्यानंतर गेले 3 वर्षापासून मुल होत नव्हते सरांकडे पुन्हा ट्रीटमेंट केली व आयु यु आय केले त्यानंतर माझ्या पत्नीला दिवस राहिल्या आहेत आता 14 आठवड्याची गर्भधारणा आहे सरांनी दोन्ही वेळा योग्य ते ट्रीटमेंट केली व्यवस्थित सल्ला दिला त्यामुळे माझ्या पत्नीला पुन्हा एकदा मातृत्व लाभले आहे मी डॉक्टर संदीप शिलाहार विमल मॅटरनिटी होम व गजानन टेस्ट बेबी सेंटर इंदिरा गार्डन जवळ देवपूर धुळे सरांचे मनापासून आभार मानतो व सरांना धन्यवाद देतो
“पत्नीच्या अंडकोषात अंडी व AMH कमी होते. सरांनी दुर्बिणीची तपासणी, अंडकोषात PRP व IUI केले — आज जुळे गर्भ राहिले आहेत!” मी श्री अब्रार मोहम्मद खाटीक वय 30 सौ मुस्कान अब्रार खाटीक वय 28 आमच्या लग्नाला सहा वर्षे झाली आहेत मी धुळ्याजवळ बोरीस या गावात राहतो माझ्या पत्नीला 6 वर्षापासून दिवस राहत नव्हते बऱ्याच डॉक्टरांकडे आम्ही ट्रीटमेंट घेतली त्यानंतर आम्ही डॉक्टर संदीप शिलाहार विमल मॅटरनिटी होम व गजानन टेस्ट ट्यूब बेबी सेंटर धुळे येथे सरांना दाखवले माझ्या पत्नीच्या अंडकोषात अंडी कमी होती तसेच तिचा ए एम एच नावाचा सराव कमी होता सरांनी तिची दुर्बिणीची तपासणी केली व अंडकोषामध्ये प्लेटलेट रिच प्लाज्मा सोडला व गोळ्या दिल्या व आय यु आय केले त्यानंतर माझ्या पत्नीला दिवस राहिले जुळे गर्भ 8 आठवड्याचे आहेत सरांनी माझ्या पत्नीचे योग्य निदान केले व व्यवस्थित ट्रीटमेंट दिली त्यानंतर आम्हाला त्याचा फायदा झाला मी त्याबद्दल सरांचे आभार मानतो
“लग्नाच्या १२ वर्षांनंतर डॉ. संदीप शिलाहार सरांनी पूर्ण नऊ महिने उत्तम काळजी व उपचार दिले, ज्यामुळे आम्हाला मुलगा झाला.” मी श्री भुषण कैलास अग्रवाल वय 34 माझी पत्नी सौ नुपूर भूषण अग्रवाल वय 32 आमच्या लग्नाला 12 वर्षे झाली डॉक्टर संदीप शिलाहार विमल मॅटरनिटी होम व गजानन टेस्ट ट्यूब बेबी सेंटर येथे आम्ही ट्रीटमेंट घेतली व आम्हाला ट्रीटमेंट घेतल्यानंतर 19 मार्च 2026 रोजी मुलगा झाला सरांनी पूर्ण नऊ महिने आमची व्यवस्थित काळजी घेतली छान ट्रीटमेंट दिली व त्यानंतर आम्हाला मातृत्व प्राप्त झाले त्याबद्दल आम्ही आभारी आहोत
“पत्नीला ११ वर्षे PCOS मुळे मूल होत नव्हते. सरांनी दुर्बिणीची तपासणी, फॉलिक्युलर स्टडी व IUI केले — अवघ्या तिसऱ्याच महिन्यात गर्भधारणा झाली!” मी श्री घनश्याम माधव मराठे वय 54 माझी पत्नी सौ सपना घनश्याम मराठे वय 36 आम्ही आमच्या लग्नाला 11 वर्षे झाली आहेत आम्ही धुळ्यात राहतो धुळ्यात बऱ्याच ठिकाणी मुल होण्यासाठी आम्ही ट्रीटमेंट घेतली नंतर जवळच्या मित्राने डॉक्टर संदीप शिलाहार विमल मॅटर्निटी होम इंदिरा गार्डन जवळ देवपूर धुळे यांचे नाव सुचवले माझ्या पत्नीला पॉलिसिस्टिक ओवरी होती डॉक्टर संदीप शिलार सरांनी दुर्बिणीची तपासणी केली त्यानंतर फॉलिक्युलर स्टडी केले व आय यु आय केले ऑपरेशन नंतर तिसऱ्या महिन्यातच माझ्या पत्नीला दिवस राहिले आहेत आता 22 आठवड्याची गर्भधारणा आहे सरांनी आम्हाला योग्य ते ट्रीटमेंट केली अचूक निदान केले त्यामुळे आज माझ्या पत्नीला मातृत्वाचा आनंद मिळाला आहे त्याबद्दल डॉक्टर संदीप शिलाहार यांना मनापासून धन्यवाद देतो
“१० वर्षांनंतर दुसऱ्या मुलासाठी अडचण होती, डॉक्टरांनी योग्य मार्गदर्शन व फॉलिक्युलर स्टडी करून अवघ्या दोन महिन्यांत यश मिळवून दिले.” मी श्री दीपक हिरामण बेडसे वय 44 माझी पत्नी सौ मनीषा दीपक बेडसे वय 39 राहणार कुसुम्बा तालुका जिल्हा धुळे आमच्या लग्नाला दहा वर्षे झाली आहेत पहिला मुलगा 8 वर्षाचा आहे त्यानंतर मूल होत नव्हते आम्ही डॉक्टर संदीप शिलाहार यांच्याकडे मूल होण्याची ट्रीटमेंट जानेवारी 2026 मध्ये घेतली व माझ्या पत्नीला मार्चमध्ये 26 दिवस राहिले डॉक्टरांनी आमचे योग्य ते निदान केले व योग्य ते मार्गदर्शन केले माझ्या पत्नीला गोळ्या दिल्या व फॉलिक्युलर स्टडी केले त्यानंतर आम्हाला दोनच महिन्यात यश मिळाले डॉक्टरांना मी मनापासून धन्यवाद देतो
“७ वर्षे व इतरत्र अपयशानंतर पत्नीचा AMH अत्यंत कमी होता. सरांनी टेस्ट ट्यूब बेबीचा योग्य सल्ला दिला आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले!” मी श्री भटू आत्माराम कच्छवे व माझी पत्नी सौ साधना भटू कच्छवे वय 27 आम्ही मालेगाव मालेगाव जवळ दहिदी गावात राहतो आमच्या लग्नाला 7 वर्षे झाली आहेत मूल होत नव्हते माझ्या पत्नीच्या अंडकोषात अंडी अत्यंत कमी होती तसेच तिचा ए एम एच नावाचा सराव अत्यंत कमी होता ह्या अगोदर आम्ही नाशिक व मालेगाव येथे ट्रीटमेंट केली पण दिवस राहिले नाहीत आमच्या जवळच्या नातेवाईकांना सरांच्या ट्रीटमेंट मुळे बाळ राहिले होते त्या जवळच्या नातेवाईकांनी आम्हाला डॉक्टर संदीप शिलाहार विमल मॅटरनिटी होम देवपूर धुळे येथे पाठवले डॉक्टरांनी आम्हाला टेस्ट ट्यूब बेबी ची ट्रीटमेंट करण्याचा सल्ला दिला व योग्य ते मार्गदर्शन केले आम्ही टेस्ट ट्यूब बेबी ची ट्रीटमेंट केली व पहिल्याच प्रयत्नात आम्हाला बाळ राहिले आम्ही दोघेही फार आनंदी आहोत डॉक्टर संदीप शिलाहार सरांनी आम्हाला व्यवस्थित सल्ला दिला योग्य ते मार्गदर्शन केले व व्यवस्थित ट्रीटमेंट केली त्यामुळे आज आम्हाला यश मिळाले व माझ्या पत्नीला मातृत्व प्राप्त झाले सरांचे आम्ही आभारी आहोत
“सेलवासमध्ये ५ वर्षे उपचारांनंतर यश आले नव्हते. सरांनी ओव्ह्युलेशन इंडक्शन व IUI केले — दुसऱ्याच महिन्यात गर्भधारणा झाली!” मी श्री भुषण कमलाकर पाटील व सौ मनीषा भूषण पाटील मी सेलवास गुजरात येथे नोकरी करतो आमच्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत मूल होत नव्हते सेलवास येथे बरीच ट्रीटमेंट केली पण फायदा झाला नाही माझं मूळ गाव सबगव्हाण तालुका अमळनेर जिल्हा जळगाव आहे माझ्या मित्राने मला सगितले एक पेशंटला डॉक्टर संदीप शिलाहार विमल मॅटरनिटी होम व गजानन टेस्ट ट्यूब बेबी सेंटर इंदिरा गार्डन जवळ धुळे यांच्या ट्रीटमेंट मुळे मूल राहिले होते त्यांनी मला सरांचे नाव सजेस्ट केले मी डॉक्टर संदीप शिलाहार विमल मॅटरनिटी होम व गजानन टेस्ट ट्यूब बेबी सेंटर धुळे येथे ट्रीटमेंट सुरू केली केली व दुसऱ्या महिन्यात सरांनी ओवूलेशन इंडक्शन व आय यु आय केले व मला दिवस राहिले आता पाचवा महिना सुरू आहे सरांनी मला योग्य ते मार्गदर्शन केले व्यवस्थित ट्रीटमेंट दिली त्याचा मला फायदा झाला मी सरांना मनापासून धन्यवाद देते
“११ वर्षे सर्व रिपोर्ट नॉर्मल असूनही मूल नव्हते. सरांनी आमची आर्थिक अडचण समजून माफक दरात IVF केले आणि पहिल्याच प्रयत्नात आम्हाला मुलगी झाली!” मी श्री दीपक गिरधन शिंदे वय 32 माझी पत्नी सौ छकुली दीपक शिंदे वय 29 आमच्या लग्नाला 11 वर्ष झाली आहे मूल होत नव्हते दोघांचेही रिपोर्ट नॉर्मल होते तरीही दिवस राहत नव्हते आम्ही बऱ्याच ठिकाणी मूल होण्यासाठी ट्रीटमेंट केली पण दिवस राहिले नाही त्यानंतर आमच्या जवळच्या नातेवाईकांच्या सल्ल्याने मी डॉक्टर संदीप शिलाहार विमल मॅटरनिटी होम देवपूर धुळे येथे ट्रीटमेंटसाठी गेलो सरांनी आम्हाला टेस्ट ट्यूब बेबी चा सल्ला दिला टेस्ट ट्यूब बेबीच्या ट्रीटमेंट बद्दल योग्य ते मार्गदर्शन केले त्यानंतर आम्ही टेस्ट ट्यूब बेबी ट्रीटमेंट केली पहिल्याच प्रयत्नात आम्हाला यश आले आम्हाला दिनांक 30 मार्च 2026 रोजी मुलगी झाली सरांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले व्यवस्थित ट्रीटमेंट केली नऊ महिने माझ्या पत्नीकडे व्यवस्थित लक्ष दिले आमची आर्थिक अडचण समजून घेतली त्यामुळे आम्हाला मातृत्वाचे स्वप्न पूर्ण झाले आमची आर्थिक बाजू कमजोर होती सरांनी आम्हाला टेस्ट ट्यूब बेबी च्या वेळी आमची आर्थिक अडचण समजून घेतली व माफक दरात टेस्ट ट्यूब बेबी चे ट्रीटमेंट केली मी व माझी पत्नी मनापासून डॉक्टर संदीप शिलाहार यांचे आभार मानतो धन्यवाद
पालकत्वाच्या दिशेने पुढचे पाऊल उचलण्यास तयार आहात?
धुळ्यात आमच्या टीमसोबत गोपनीय सल्लामसलत बुक करा आणि काळजीचा हा दृष्टिकोन स्वतः अनुभवा.
WhatsApp वर संदेश पाठवणे ही केवळ चौकशी आहे. आमची टीम उत्तर देऊन तुमच्याशी वेळ ठरवते तेव्हाच तुमची अपॉइंटमेंट निश्चित होते.